जगातील जवळजवळ अर्धी लोकसंख्या ग्रामीण भागांमधून अत्यंत गरिबीच्या अवस्थेत राहते. मानवाच्या विकासामधील अशा प्रकारची असमानताच जागतिक अशांतता आणि जगातील काही भागात होणार्या हिंसेला कारणीभूत ठरते. - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती अन्नधान्याची उपलब्धता ही जगातल्या नेत्यांनी गृहीत धरली आहे. मात्र, त्याचवेळी जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या अर्धपोटी राहते, या वस्तुस्थितीकडे डोळेझाक केली जात आहे! - नॉर्मन बोरलॉग, हरित क्रांतीचे जनक मानवजातीचं अस्तित्व टिकविण्यासाठी एकेकाळी प्रजावृद्धी गरजेची होती. पण आता त्याच मानवजातीचे संरक्षण करण्यासाठी आणि तिचे अस्तित्व टिकविण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण अत्यंत आवश्यक झाले आहे! - हेलन केलर, पहिली अंध, मूकबधिर पदवीधर लोकसंख्यावाढीला न्याय्य आणि सौहार्दपूर्ण मार्गाने आताच लगाम लावला नाही, तर तीच गोष्ट निसर्ग अत्यंत क्रूरपणे कसलीही दयामाया न दाखवता पार पाडेल आणि मग मागे उरेल एक उध्वस्त जग! - डॉ. हेन्री डब्ल्यू. केनडॉल, नोबेल पुरस्कार विजेते बेसुमार लोकसंख्यावाढीमुळे पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण पडत आहे. लोकसंख्या वाढीवर संतुलन आणण्यासाठी स्त्रिया-मुलींना शिक्षित करणे हा या समस्येवरील एक परिणामकारक उपाय ठरू शकेल. याशिवाय महिलांना राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळणे आणि त्यांच्या पुनरुत्पादन हक्काचे संरक्षण करणेही या संदर्भात महत्त्वपूर्ण ठरेल. -अल गोर, अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष एकीकडे लोकसंख्येची होत असणारी प्रचंड वाढ, तंत्रज्ञानाने होणारे परिवर्तन आणि त्याचबरोबर ज्यांचा आपण एक भाग आहोत, अशा नैसर्गिक यंत्रणांबाबत आपल्याला असलेली अनास्था यामुळे आज जगात एक अव्यवस्था असंतुलन निर्माण झाले आहे आणि आपण झपाट्याने विनाशाकडे जात आहोत. - डेव्हिड सुझुकी, पर्यावरणवादी (कॅनडा) जगातील लोकसंख्येच्या एक अष्टमांश म्हणजेच एक अब्जच्या जवळपास लोक हे उपाशीपोटी अवस्थेत राहतात. दर वर्षी दोन दशलक्ष बालके कुपोषणाने मृत्युमुखी पडतात आणि याचवेळी ब्रिटनमधले डॉक्टर्स सुखवस्तू नागरिकांना अतिस्थुलतेबाबत धोक्याचा इशारा देत आहेत. एकीकडे लोकांची उपासमार होत असताना दुसरीकडे काही लोक बेसुमार खात सुटले आहेत! - जोनाथन हेन्री सॅक्स, ज्यू धर्मगुरू स्त्रोत - वनराई जूलै 15