या माहितीपटात एक प्रयोग दिलेला आहे . याची कृती खालीलप्रमाणे सर्वप्रथम एक पाण्याने भारलेल भांड घ्या त्या भांड्यात एक संत्र टाका आणि पहा ते संत्र पाण्यात वरती तरंगेल . त्यानंतर दुसर संत्र सोलून त्या पाण्यात टाका आणि पहा ते संत्र पाण्यात बुडेल .याचा अर्थ असा पाण्याची घनतेपेक्षा साल नसलेलं संत्राची घनता जास्त आहे . संत्राच्या सालीमध्ये जास्तीत जास्त एअर बबल असतात आणि या एअर बबल मुळे सालची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी होते .म्हणून साल असलेल संत्र पाण्यावर तरंगत आणि साल नसलेलं संत्र पाण्यात बुडत . कालावधी - ३.17 मिनिट स्त्रोत - http://www.arvindguptatoys.com तरंगणारे संत्र .