दूरचित्रवाणीने घरा-घरात महत्त्वाची जागा पटकाविली. अन् तुलनेने तंत्रज्ज्ञानाच्या दृष्टीने आघाडीवर असणाऱ्या देशातील कार्टून्सची लोभस दुनिया आपल्या देशातल्या बच्चेकंपनीपुढे अवतरली. सुरवातीला 'जंगल बुक’, वॅाल्ट डिस्नेच्या अनेक कार्टून्सच्या मालिकांनाही मुलांना खिळवून ठेवले. दुरचित्रवाणी वाहिन्यांवर एक-दोन कार्यक्रम सुरू असायचे. आजचा विचार केला तर, संपूर्ण वाहिनी ही ॲनीमेटेड कार्यक्रमांवर सुरू आहे आणि अशा अनेक वाहिन्या अनेक भाषांमधून सुरू आहेत. राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय स्तरावर, कार्टुन नेटवर्क-चॅनल्स, कार्टून फिल्म, लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेले विविध गेम्स, ॲनिमेटड फिल्म, एवढच नाहीतर चित्रपट सृष्टीतही अनेक दृश्य प्रत्यक्ष चित्रीकरण न करता ॲनिमेटेड केलेली असतात. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ती आपल्याला वास्तववादी भासतात, वृत्तवाहिन्यांवरही अनेक स्टोरी या ॲनिमेटेड करून दाखविल्या जातात. ॲनिमेटेड तंत्रज्ञानाचे क्षेत्र विकसीत होत आहे. इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये ॲनिमेटेड तंत्रज्ञानाने मोठी जागा घेतली आहे. यामुळे यातील तज्ञांची मागणीही वाढत आहे आणि भविष्यातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संधी उपलब्ध आहेत.

भारतात बी.एसस्सी. इन ॲनिमेशन हा शिक्षणक्रम उपलब्ध असलेली १८० महाविद्यालये आहेत.

बी.एसस्सी. इन ॲनिमेशन – हा तीन वर्षाचा पूर्ण वेळ शिक्षणक्रम असून, 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्राणा, प्राईम फोकस, रेड चिली एन्टरटेंटमेंट, युटीव्ही आदींसारख्या इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

बी.एस.स्सी. मिडीया ग्राफीक ॲण्ड ॲनिमेशन - हा तीन वर्षाचा पदवी शिक्षणक्रम असून, 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कम्प्युटर आणि इंटरनेटची ओळख, ड्रॉईंग ॲण्ड स्केचिंग, कलर थेअरी, टायपोग्राफी, ॲडॉब फोटोशॉप, ॲडॉब इलुस्ट्रेटर, मल्टीमिडीया आणि अप्लीकेशन्सची ओळख, डेव्हलपींग प्रेझेंटेशनची आदी अभ्यासक्रमाचा समावेश असतो. डेल, कॅप जेमिनी, हंगामा, आयबीएम, शादी डॉट कॉम, सुर्या यासारख्या अनेक नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

बी.एस.स्सी. ॲण्ड मल्टीमिडीया - तीन वर्षाचा पदवी शिक्षणक्रम असून, 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ग्राफीक डिझाईन, २डी ॲनीमेशन ॲण्ड वेब, बेसिक ऑफ ३डी ॲनिमेशन, ॲडव्हान्स ३डी ॲनीमेशन आदी विषय अभ्यासक्रमात आहेत. ॲम्बीयस डीझाईन ॲनीमेशन, गॅलेक्सी डेल्टा इंटेरियर, टॉमी हिलफीगर, रिदम ॲण्ड हाऊस आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

बी.एस.स्सी. ॲनीमेशन ॲण्ड व्हीज्युअल इफेक्ट - हा तीन वर्षाच पदवी शिक्षणक्रम असून, यास प्रवेश घेण्यासाठी 10 वी नंतर तीन वर्षाचा टेक्नीकल डिप्लोमा किंवा 02 वर्षाचा आय.टी.आय. पूर्ण असणे आवश्यक आहे.

३डी ॲनीमेशन ॲण्ड व्हीज्युअल इफेक्ट पदवी - हा तीन वर्षाचा पदवी शिक्षणक्रम असून, 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

बी.एस.स्सी इन व्ही.एफ.एक्स ॲण्ड ॲनीमेशन - हा तीन वर्षाचा पुर्ण वेळ शिक्षणक्रम असून, १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ग्राफीक ॲण्ड मल्टीमिडीया व्होकॅशनल पदवी - हा तीन वर्षाचा अर्धवेळ शिक्षणक्रम आहे. 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

बी.एस.स्सी. इन ॲनीमेशन ॲण्ड मल्टीमिडीया टेक्नॉलॉजी - हा तीन वर्षाचा पदवी शिक्षणक्रम आहे. 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अमेझॉन, ओबेरॉय, वेरीझॉन, व्हिडीओ कॉन, गुगल, गोदरेज, फ्लीपकार्ट आदी सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

लेखिका - श्रद्धा मेश्राम नलावडे

meshram.shraddha@gmail.com

माहिती स्रोत : महान्यूज