माल वाहतुकीसाठी पुर्वापार वापरात येणारा, मोठा मार्ग म्हणजे सागरी मार्ग. आजही मोठ्या प्रमाणात सागरी वाहतुकीचा वापर केला जातो. जहाजातून व्यापारी मालाची आयात आणि निर्यात केली जाते. एकंदरीत ८० टक्के वाहतूक सागरी मार्गाने होते. देशात दोनशे बंदरे आहेत. एकुणच देशाचा आर्थिक विकास दळणवळण सुविधेशी निगडीत असतो. आपल्या देशाला समृद्ध समुद्र किनारा लाभला असल्याने सागरी वाहतुकीस उत्तेजन मिळावे म्हणून शासनही प्रयत्नशील असल्याचे दिसते. जहाज बांधणी, जहाज उद्योगाशी विविध निगडीत अनेक घटकांचे क्षेत्रही विस्तारते आहे. आधुनिक तंत्राचा वापर या क्षेत्रात होत असल्याने कुशल मनुष्यबळाची गरजही मोठ्या प्रमाणात भासते आहे. या बाबींचा विचार करता मरीन इंजिनिअरिंग हे क्षेत्र फायद्याचे ठरेल. त्या अनुषंगाने या क्षेत्रातील संधीचा घेतलेला आढावा खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी..

पात्रता

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री मॅथ्ससह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या विषयात बीई वा बीटेक हे पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. तसेच बीई वा बीटेक कोर्समध्ये प्रवेश जेईईच्या गुणाच्या आधारावर मिळतो. या विषयात पदव्युत्तर पदवीही घेता येते. इथे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. उमेदवाराची उंची किमान १५० सेमी हवी. तसेच त्यास दृष्टीदोष असता कामा नये.

आवश्यक गुण

एक यशस्वी मरीन इंजिनिअर होण्यासाठी टीम वर्क करता यायला हवे. तसेच प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची तयारी हवी. त्याचबरोबर नेतृत्व गुण, तार्किक अंदाज बांधणे, उत्तम संवाद कौशल्य असल्यास फायद्याचे ठरते.

कामाचे स्वरुप

हा विषय नॉटिकल आर्किटेक्चर आणि विज्ञानासंबंधी आहे. खास करून जहाजे व समुद्री नौकांना बनविणे आणि त्याची दुरुस्ती देखभाल करणे ही कामे असतात. समुद्री आर्कीटेक्ट म्हणून तो भूमिका बजावत असतो. अर्थात जहाजाच्या संपूर्ण देखभालीची जबाबदारी मरीन इंजिनिअरची असते. तांत्रिक बाबींचे कार्य तो करतो. हे काम व्यापक असून आधुनिक तंत्राच्या सहाय्याने ते आता पार पडले जाते.

प्रशिक्षणात काय शिकाल?

या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यास समृद्ध करणारे अनुभव मिळत असतात. यात बॉयलर, बॉयलर केमिस्ट्री, अॅडव्हांस हायड्रोलिक्स, पॉवर प्लॅण्ट ऑपरेशन्स, शीप ऑपरेशन्स, मॅनेजमेंट, ओशन थर्मल एनर्जी आदी विषयावर पाठ्यक्रम आणि प्रात्यक्षिक कार्यही असते.

आव्हाने

मरीन इंजिनिअर केवळ जहाजांची निर्मिती करत नाही तर प्रसंगी लोकांचे जीव वाचविण्याचे धाडसाचे काम देखी त्याला करावे लागते. या क्षेत्रात नेहमी सतर्कता बाळगावी लागते. अनेक महिने समुद्रात प्रवास करावा लागतो. एका अर्थाने हे क्षेत्र साहसाचे आहे.

कामाच्या संधी

या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत. इंडियन मर्चंट नेवी, नौसेना, जहाज निर्माण कंपनी, शिपिंग कॉर्पोरेषन ऑफ इंडिया आदी ठिकाणी काम मिळेल. तसेच आंतरराष्ट्रीय संस्था ‘द अमेरिकन ब्युरो ऑफ शिपिंग’ या संस्थेतही संधी आहेत.

वेतन

सुरुवातीस २५ ते ३० हजारापासून वेतनास सुरुवात होते. परदेशातही नोकरीच्या संधी आहेत आणि पगाराचे उत्तम पॅकेजही मिळते.

कोर्सेस

• बीएससी (नॉटीकल सायन्स)

• बीई/बीटेक (मरीन इंजिनिअरिंग)

• एमई (मरीन इंजिनिअरिंग)

प्रशिक्षण संस्था

• इंडियन मरीटाईम विद्यापीठ मुंबई

• सागरी अभियांत्रिकी आणि संशोधन संस्था हाजी बंदर रोड, मुंबई

• डॉन बॉस्को इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कुर्ला, मुंबई

• ट्रेनिंगशिप चाणक्य कार्वे, नवी मुंबई

• मरीन इंजिनिअरिंग अँड रिसर्च इन्स्टीट्युट कोलकाता, मुंबई

• इन्स्टीट्युट ऑफ मरीन इंजिनिअरिंग नेरूळ, नवी मुंबई

• नवल सागरी अकादमी कुलाबा, मुंबई

• द ग्रेट ईस्टर्न इन्स्टीट्युट ऑफ मरीटाईम स्टडीज, लोणावळा

• यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक

• इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली

• इंडियन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास

लेखक: सचिन के. पाटील

माहिती स्रोत: महान्युज