वाणिज्य शाखा. कोणत्याही व्यवस्थापनातील महत्त्वाची शाखा असते. या विस्तारलेल्या आणि अतिशय महत्त्वाची जबाबदारी असलेल्या क्षेत्रात करियर करावयाचे असेल, तर १० वी नंतरच तुम्ही वाणिज्य शाखेतील शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ शकता. या क्षेत्रात करियर करण्यासाठी संबंधित वाणिज्य (बी.कॉम.) शिक्षणक्रमाची माहिती घेऊ...

वाणिज्य शाखेतील पदवी

हा तीन वर्षाचा पदवी शिक्षणक्रम असून, 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फायनान्शीयल अकाऊंटींग, बिझनेस मॅथेमॅटीक्स ॲण्ड स्टॅटिस्टीक, बिझनेस इकोनॉमीक्स, कम्प्युटर फंडामेंटल ॲण्ड अप्लीकेशन आदी विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश असतो.

बी.कॉम. प्रोफेशनल

हा तीन वर्षाचा पदवी शिक्षणक्रम आहे. साधारण २ लाख ३० हजार शैक्षणिक शुल्क आहे. १२ वी ६० टक्केसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

बी.कॉम. (Hons.)

हा तीन वर्षे पूर्ण वेळ पदवी शिक्षणक्रम आहे. १२ वी ५५ टक्केसह पूर्ण असणे आवश्यक आहे. बिझनेस मॅथेमॅटीक्स, मॅनेजमेंट फाउंडेशन, फायनान्शीयल अकांऊंटींग, मायक्रो इकोनॉमीक्स, फॉरेन बिझनेस लॅग्वेज, इंडियन फायनांन्शीयल सिस्टम आदी विषय अभ्यासक्रमात असतात. साधारण तीन लाख ६६ हजार शिक्षणक्रम शुल्क असते.

बी.कॉम. इन ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम (व्होकॅशनल)

हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम असून, मार्केटींग ॲण्ड सर्व्हीस मॅनेजमेंट, इंडियन कॉन्स्टीट्युशन ॲण्ड ह्युमन राईट्स, इंडियन फायनांन्शीयल सिस्टम आदी विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश असतो.

बी.कॉम. (Hons) + कंपनी सेक्रेटरी

हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. एक लाख ५० हजार एवढे शिक्षणक्रम शुल्क आहे.

बी.कॉम. इन कम्प्युटराईज्ड अकांउंटींग

हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. किमान ४५ टक्केसह १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रिंसीपल ऑफ मॅनेजमेंट, बिझनेस इकोनॉमीक, फायनान्शीयल अकांऊंटींग, बिझनेस लॉ, बिझनेस स्टॅटिस्टीक आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. ॲक्सीस बँक, टीसीएस, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट, आयबीएम, एचसीएल, हिंदूस्थान टाईम्स, मारूती सुझूकी आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते. साधारण २ लाख शैक्षणिक शुल्क आकारले जाते.

बी.कॉम. इन फायनान्स ॲण्ड इन्व्हेसमेंट ॲनालीसेस

हा तीन वर्षाचा ऑनलाईन पदवी शिक्षणक्रम आहे. एक लाख २० हजार एवढे शिक्षणक्रम शुल्क आकारले जाते. गुगल, एचपी, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, नोकीया, पेप्सीको आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

परदेश व्यापार या विषयात पदव्युत्तर पदवी

हा एक वर्षाचा पूर्ण वेळ पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम आहे.

बी.कॉम. इन फायनान्स ॲण्ड अकांऊंट

हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. यास प्रवेश घेण्यासाठी 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फायनान्शीयल अकांउंटींग, बिझनेस मॅथेमॅटीक्स, बिझनेस इकोनॉमिक, प्रिन्सीपल ऑफ मॅनेजमेंट, कम्प्युटर फंडामेंटल आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. अमेरिकन एक्सप्रेस, एचडीएफसी बँक, इंडिया बुल्स, एसबीआय लाईफ, युएई एक्सचेंज आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

बी. कॉम. इन फायनान्शीयल मार्केट मॅनेजमेंट

हा तीन वर्षाचा पूर्ण वेळ पदवी शिक्षणक्रम आहे. १० + २ उत्तीर्ण असणे आवश्यक असून, वय २२ वर्षे असणे आवश्यक आहे. एचसीएल, आयबीएम, आयसीआयसीआय, स्टार टी.व्ही., टी.सी.एस. आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

बी.कॉम. इन बँकिंग मॅनेजमेंट

हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. २ लाख ४० हजार शैक्षणिक शुल्क असून, १० + २ पूर्ण असणे आवश्यक आहे. बिझनेस कम्युनिकेशन, फायनान्शियल अकांऊंटींग, सॉफ्ट स्कील सब्जेक्ट आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. डेल, ओरॅकल, एचसीएल, हुंडाई, इन्फोसीस आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

१०५२ वाणिज्य शाखेचे शिक्षण देणारे महाविद्यालय भारतात आहेत. अमीटी विद्यापीठ, पनवेल, मुंबई विद्यापीठ, फोर्ट कॅम्पस, मिठीबाई कॉलेज विलेपार्ले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ पुणे आदीसह अनेक विद्यापीठ आणि महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षणक्रम उपलब्ध आहेत.

सी.ए., सी.एस. , डिप्लोमा इन अकांऊंटींग, डिप्लोमा इन टॅक्सेशन आदी या क्षेत्राशी संबंधित विषयांची माहिती पुढील भागात घेऊ...

लेखिका - श्रद्धा मेश्राम

meshram.shraddha@gmail.com

माहिती स्रोत : महान्यूज