अरे खोप्यामधी खोपासुगडिणीचा चांगलापहा पिल्लासाठी तिनंझोका झाडाला टांगलापिल्लं निजती खोप्यातजसा झुलता बंगलातिचा पिल्लांमधी जीवजीव झाडाला टांगलाखोपा विणला विणलाजसा गिलक्याचा कोसापाखरांची कारागिरीजरा बघ रे माणसातिची उलूशीच चोचतेच दात, तेच ओठतुले दिले रे देवानंदोन हात, दहा बोटं कवियत्री : बहिणाबाई चौधरी