बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहोहे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधलेराष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला होवैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीनतिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला होहातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडूनऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला होकरि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊविश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहोया उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थहे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहोही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेलजगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो कवी : साने गुरुजी