ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळलाभूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होतामज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहूतइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलेंमार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीनविश्वसलो या तव वचनी । मीजगदनुभव-योगे बनुनी । मीतव अधिक शक्त उद्धरणी । मीयेईन त्वरे कथुन सोडिलें तिजलासागरा, प्राण तळमळलाशुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशीभूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होतीगुण-सुमनें मी वेचियली या भावें । की तिने सुगंधा घ्यावेंजरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचाती आम्रवृक्षवत्सलता । रेनवकुसुमयुता त्या सुलता । रेतो बाल गुलाबहि आता । रेफुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळलानभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा ताराप्रासाद इथे भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारीतिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्याभुलविणें व्यर्थ हें आता । रेबहु जिवलग गमतें चित्ता । रेतुज सरित्पते जी सरिता । रेत्वद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळलाया फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसात्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतेमन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशीतरि आंग्लभूमी-भयभीता । रेअबला न माझिही माता । रेकथिल हे अगस्तिस आता । रेजो आचमनी एक क्षणी तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला कवी : स्वातंत्र्यवीर सावरकर