● या कीटकाला घुंगरटे असेही नाव आहे. त्याचा समावेश डिप्टेरणाच्या क्लोरोपिडी कुलात होतो.

● त्याच्या पुष्कळ जाती असून त्या जगभर सर्वत्र आढळतात.

● सायपंक्युला फ्युनिकोला ही जाती भारतात आढळते व हिप्पेलेट्स प्युसिओ ही जाती अमेरिकेत आढळते.

● ते. १·६ – ४·८ मिमी. लांब असते. ते बहुधा काळसर करडे, अनावृत किंवा किंचित केसाळ व चपळ असते. डोके काहीसे कोनयुक्त मुखीय दृढरोम ऱ्हसित (ऱ्हास पावलेले) किंवा नसतात.

● शृंगिका (सांधे असणारी लांब स्पर्शेंद्रिये) सुस्पष्ट आणि पुढे विस्फारित असतात. पंखाची प्राथमिक शीर ऱ्हसित असून द्वितीयक शीर बिंबवत (तबकडीसारखी) व चौथी शीर वाकडी असते. त्याची अळी आखूड, दंडगोलाकार असून तिच्या तोंडावरील अंकुश (आकडे) स्पष्ट दिसतात.

● अळीच्या शृंगिका द्विखंडी (दोन भाग असलेल्या) असून डिंभपाद म्हणजे भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्थेत असणारे पाय मांसल असतात.

उपद्रव

● दिवसा चिलटे माणसाचे डोळे, कान, नाक, तोंड यांभोवती घोंघावून हैराण करतात.

● तसेच त्यांचा पाळीव प्राण्यांनाही उपद्रव होतो. ते डोळे येणे या रोगाच्या सूक्ष्मजंतूंचा प्रसार करतात. त्यामुळे कधीकधी डोळे येण्याची साथ येते.

● तसेच ते उष्ण कटिबंधातील दमट भागात पायांना होणाऱ्या ‘नागा’ व्रण या रोगाचा प्रसार करतात.

लेखक- ज. वि.जमदाडे

स्रोत- मराठी विश्वकोश