पाकिस्तानचा इतिहासप्रसिद्ध प्रांत. क्षेत्रफळ ३,४७,१८८ चौ. किमी. लोकसंख्या २५,६२,००० (१९७५ अंदाज). विस्तार २४º५४’ उ. ते ३२º४’ उ. अक्षांश आणि ६०º५६’ पू. ते ७०º१५’ पू. रेखांश यांदरम्यान असून याच्या पश्र्चिमेस इराण, उत्तरेस अफगाणिस्तान, दक्षिणेस अरबी समुद्र व पूर्वेस सिंध आणि पंजाब हे पाकिस्तानचे प्रांत आहेत. बलुचिस्तानमध्ये व्केट्टा-पिशिन, सिबी, झोब, लोरालाई, चागई हे पाच जिल्हे व कलात, लास बेला, खारान व मकरान या चार भूतपूर्व संस्थानांचा समावेश होतो. बलुची किंवा बलोच (भटके) जमातीवरून यास ‘बलुचिस्तान’ हे नाव पडले. व्केट्टा [लोकसंख्या १,५६,००० (१९७६ अंदाज)] ही या प्रांताची राजधानी आहे. बलुचिस्तानचा बहुतेक भाग डोंगराळ व रूक्ष वाळवंटांनी व्यापलेला आहे. भौगोलिक दृष्टया याचे मध्य व ईशान्येकडील डोंगराळ भाग (खोरासान प्रदेश), कच्छी मैदान, बोलन व खोजाक खिंडींचा भाग आणि समुद्रकिनारी व नद्यांच्या खोऱ्यांतील मैदानी प्रदेश असे विभाग पडतात. बलुचिस्तानमध्ये सुलेमान पर्वतश्रेणी, तोबा-काकर पर्वतरांग, मकरान, खारान, चागई, पाब, कीर्थर, मध्य ब्राहूई या प्रमुख पर्वतरांगा असून झरगून (३,५७८ मी.) हे येथील सर्वोच्च शिखर आहे. त्याखालोखाल खलीफत (३,४८५ मी.) व तख्त-इ-सुलेमान किंवा कैसरगढ (३,४४१ मी.) ही अन्य शिखरे आहेत. बोलन व खोजक या प्रमुख खिंडी होत. मैदानी भाग हा समुद्रकिनारी व नद्यांच्या खोर्यां तून असून ९६५ किमी. लांबीचा समुद्रकिनारा बलुचिस्तानला लाभलेला आहे. चागई, खारान, मकरान ही मोठी वाळवंटे आहेत. येथील नद्यांना बारमहा पाणी नसते. बहुतेक नद्या सिंधू नदीस अथवा अरबी समुद्रास मिळतात. झोब, नारी, दश्त, हिंगोल, पोराली-नाई, हब, पिशिन-लोरा या प्रमुख नद्या व हामून-इ-लोरा, हामून-इ-मश्केल ही प्रमुख सरोवरे आहेत. समुद्रकिनारा वगळता इतरत्र स्थूलमानाने उपोष्ण कटिबंधीय खंडीय प्रकारचे हवामान आहे. वार्षिक सरासरी किमान तपमान समुद्रकिनारी ३०ºसे., वाळवंटी प्रदेशात ३७ºसे. व पर्वतीय भागात २४ºसे. असते. मान्सून हवामानाच्या टापूत हा प्रांत येत नसल्याने त्याचाही येथील हवामानावर परिणाम होतो. पावसाचे प्रमाण कमी असून किनारी भागात ते वर्षांकाठी सरासरी सु. २८ सेंमी., तर पर्वतीय भागात सु. ४१ सेंमी. असते. पर्वतीय भागैत जूनिपर, लॉरेल, पाइन, ऑलिव्ह, अँश, पॉप्लर, विलो तसेच जिरे, हिसप इ. तर वाळवंटी भागात काटेरी झुडुपे, खजुराची झाडे आढळतात. चिकोर, सिसी, शकुक, सोनेरी गरूड इ. पक्षी तसेच उंट, शेळ्या-मेंढ्या, बकऱ्या, घोडे इत्यादींचे अनेक प्रकार आहेत. पर्वतीय भागांत चित्ता, काळे अस्वल हेही प्राणी अधूनमधून आढळतात. समुद्रकिनारी शार्क, रांजा, सार्डिन, मांजरमासा, हेरिंग इ. मासे सापडतात. बलुचिस्तान पाकिस्तानचा इतिहासप्रसिद्ध प्रांत. क्षेत्रफळ ३,४७,१८८ चौ. किमी. लोकसंख्या २५,६२,००० (१९७५ अंदाज). विस्तार २४º५४’ उ. ते ३२º४’ उ. अक्षांश आणि ६०º५६’ पू. ते ७०º१५’ पू. रेखांश यांदरम्यान असून याच्या पश्र्चिमेस इराण, उत्तरेस अफगाणिस्तान, दक्षिणेस अरबी समुद्र व पूर्वेस सिंध आणि पंजाब हे पाकिस्तानचे प्रांत आहेत. बलुचिस्तानमध्ये व्केट्टा-पिशिन, सिबी, झोब, लोरालाई, चागई हे पाच जिल्हे व कलात, लास बेला, खारान व मकरान या चार भूतपूर्व संस्थानांचा समावेश होतो. बलुची किंवा बलोच (भटके) जमातीवरून यास ‘बलुचिस्तान’ हे नाव पडले. व्केट्टा [लोकसंख्या १,५६,००० (१९७६ अंदाज)] ही या प्रांताची राजधानी आहे. बलुचिस्तानचा बहुतेक भाग डोंगराळ व रूक्ष वाळवंटांनी व्यापलेला आहे. भौगोलिक दृष्टया याचे मध्य व ईशान्येकडील डोंगराळ भाग (खोरासान प्रदेश), कच्छी मैदान, बोलन व खोजाक खिंडींचा भाग आणि समुद्रकिनारी व नद्यांच्या खोऱ्यांतील मैदानी प्रदेश असे विभाग पडतात. बलुचिस्तानमध्ये सुलेमान पर्वतश्रेणी, तोबा-काकर पर्वतरांग, मकरान, खारान, चागई, पाब, कीर्थर, मध्य ब्राहूई या प्रमुख पर्वतरांगा असून झरगून (३,५७८ मी.) हे येथील सर्वोच्च शिखर आहे. त्याखालोखाल खलीफत (३,४८५ मी.) व तख्त-इ-सुलेमान किंवा कैसरगढ (३,४४१ मी.) ही अन्य शिखरे आहेत. बोलन व खोजक या प्रमुख खिंडी होत. मैदानी भाग हा समुद्रकिनारी व नद्यांच्या खोर्यां तून असून ९६५ किमी. लांबीचा समुद्रकिनारा बलुचिस्तानला लाभलेला आहे. चागई, खारान, मकरान ही मोठी वाळवंटे आहेत. येथील नद्यांना बारमहा पाणी नसते. बहुतेक नद्या सिंधू नदीस अथवा अरबी समुद्रास मिळतात. झोब, नारी, दश्त, हिंगोल, पोराली-नाई, हब, पिशिन-लोरा या प्रमुख नद्या व हामून-इ-लोरा, हामून-इ-मश्केल ही प्रमुख सरोवरे आहेत. समुद्रकिनारा वगळता इतरत्र स्थूलमानाने उपोष्ण कटिबंधीय खंडीय प्रकारचे हवामान आहे. वार्षिक सरासरी किमान तपमान समुद्रकिनारी ३०ºसे., वाळवंटी प्रदेशात ३७ºसे. व पर्वतीय भागात २४ºसे. असते. मान्सून हवामानाच्या टापूत हा प्रांत येत नसल्याने त्याचाही येथील हवामानावर परिणाम होतो. पावसाचे प्रमाण कमी असून किनारी भागात ते वर्षांकाठी सरासरी सु. २८ सेंमी., तर पर्वतीय भागात सु. ४१ सेंमी. असते. पर्वतीय भागैत जूनिपर, लॉरेल, पाइन, ऑलिव्ह, अँश, पॉप्लर, विलो तसेच जिरे, हिसप इ. तर वाळवंटी भागात काटेरी झुडुपे, खजुराची झाडे आढळतात. चिकोर, सिसी, शकुक, सोनेरी गरूड इ. पक्षी तसेच उंट, शेळ्या-मेंढ्या, बकऱ्या, घोडे इत्यादींचे अनेक प्रकार आहेत. पर्वतीय भागांत चित्ता, काळे अस्वल हेही प्राणी अधूनमधून आढळतात. समुद्रकिनारी शार्क, रांजा, सार्डिन, मांजरमासा, हेरिंग इ. मासे सापडतात. स्त्रोत : मराठी विश्वकोश