आली सुट्टी… आली सुट्टी… आली - आली - रे ! चला मुलांनो मिळून सारे मज्जा करूया रे … अभ्यासाशी नकोच गट्टी, जोरदार कट्टी रे … नाचू - गाऊ - उड्या मारू, शिट्टी वाजवू रे… शिबीरांचा नकोच मारा, मोकाट हिंडू रे … हिरव्या रानचा पिऊन वारा, झोके घेऊ रे … आली सुट्टी… आली सुट्टी… आली - आली - रे ! माहिती संकलन: प्राची तुंगार