ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ऐकू आली फोनची रिंग - कुणीच नाही फोनपाशी उंदीरमामा बिळापाशी ! उंदीरमामा हसले मिशीत ,टेबलावरती चढले खुषीत - फोन लावला कानाला जोरात लागले बोलायला - " उंदीरमामा मी इकडे ;कोण बोलतय हो तिकडे ? " - विचारले मामानी झटकन उत्तर आले की पटकन- " मी तुमची मनीमावशी, कालपासून आहे उपाशी ." - मनीमावशी भलती हुषार ,टुणकन मामा बिळात पसार !!