उठा उठा चिऊताईसारीकडे उजाडलेडोळे तरी मिटलेलेअजूनही अजूनही ।।धृ।।सोनेरी हे दूत आलेघरट्याच्या दारापाशीडोळ्यांवर झोप कशीअजूनही अजूनही ।।१।।लगबग पाखरे हीगात गात गोड गाणेटिपतात बघा दाणेचोहीकडे चोहीकडे ।।२।।झोपलेल्या अशा तुम्हीआणायाचे मग कोणीबाळासाठी चारापाणीचिमुकल्या चिमुकल्या ।।३।।बाळाचे मी घेता नावजागी झाली चिऊताईउठोनिया दूर जाईभूर भूर भूर भूर ।।४।। स्त्रोत-शिक्षक मंच