गोरी गोरीपान, फुलासारखी छानदादा, मला एक वहिनी आण ।।धृ।। दादा, मला एक...गोर्या गोर्या वहिनीची अंधाराची साडीअंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडीचांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण ।।१।। दादा, मला एक...वहिनीला आणायाला चांदोबाची गाडीचांदोबाच्या गाडीला हरणांची जोडीहरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान ।।२।। दादा, मला एक...वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापातुला दोन थापा, तिला साखरेचा पापाबाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान ।।३।। दादा, मला एक... स्त्रोत - शिक्षक मंच