पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचेमम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची ।।धृ।।इवल्या इवल्या घरट्यात, चिमणा चिमणी राहतातचिमणा-चिमणी अन् भवती, चिमणी पिल्लेही चिवचिवती ।।१।।आभाळ पेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारीचोचीत चोचीने घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा ।।२।।पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळतानाहासते नाचते घर सारे, हासते छ्प्पर, भिंती, दारे ।।३।। स्त्रोत - शिक्षक मंच