मंद -मंद - वाऱ्याची झुळूक मी होणार बंद -बंद --कळीला फुलवत राहणार । टप -टप पडणारा थेंब मी होणार पट -पट मोती माळत राहणार । रट --रट शिजणारा तृण मी होणार मट --मट खाणाऱ्यास तृप्त मी करणार । लुक -लुकता आकाश दीप मी होणार चम -चमता प्रकाश धरतीला देणार । गर -गर फिरणारे चाक मी होणार भर -भर विद्न्यानास आकार मी देणार । कण -कण बीज बनून मातीत मी जाणार मण -मण धान्य बनून सुवर्णमय होणार ! माहिती संकलन: प्राची तुंगार