हु S S प... हु SS प... करत, माकड शिरले घरात । धडाड --धुडूम डबे पाडले, कांदे -- बटाटे -- घरभर विखुरले । T V वर जाऊन बसले, खी --खी -- खी -- खी हसू लागले । बाबांनी उगारली काठी, धावले माकडाच्या पाठी । माकड मुळु --मुळु रडत बसले माझ्या सोबत । मला सांगू लागले, आमचे जंगल तोडले । घर नाही उरले, हरवली पिल्ले ! राहू कसा झाडाविना ? जगू कसा अन्ना विना ? मला त्याचे दुखः कळले, मनाशी एकच ठरवले । एक - एक झाड लावायचं, पर्यावरण राखायच । माकड झाले खूपच खुश ! गेले करत हु SS प हु SS प । माहिती संकलन: प्राची तुंगार