इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा आधार मिळणार आहे. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’ची सन 2016-17 पासून सामाजिक न्याय विभागाने सुरूवात केली आहे. योजनेच्या अटी विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी किंवा पदविका परीक्षेत 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 टक्के गुण असणार आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजारपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा, अर्थात स्थानिक नसावा. गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधारकार्डशी संलग्न करून घेणे बंधनकारक आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येईल. खर्चाची बाब मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचव, नागपूर या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागीय शहर व 'क' वर्ग मनपा शहरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उर्वरित शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता (वार्षिक) 32000 रु. 28000 रु. 25000 रु. निवास भत्ता (वार्षिक) 20000 रु. 15000 रु. 12000 रु. निर्वाह भत्ता (वार्षिक) 8000 रु. 8000 रु. 6000 रु. एकूण (वार्षिक) 60 हजार रुपये 51 हजार रुपये 43 हजार रुपये टिप :- वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकिय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रू.पाच हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु. दोन हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी अतिरिक्त स्वरूपात देण्यात येईल.या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहीत नमुना व सविस्तर माहिती https://mahaeschol.maharashtra.gov.in, https://sjsa.maharashtra.gov.in, https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्ह्यातून निर्गमित करण्यात आलेले आहे, त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे समक्ष/टपालाद्वारे आवश्यक कागदपत्रासह दाखल करावेत.संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक. स्त्रोत - महान्युज