अध्यापक विदयालयातील ३० टक्के महिलांना आरक्षण प्रश्नोत्तरे अध्यापक विदयालयातील ३० टक्के महिलांना आरक्षण १. सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . अध्यापक विदयालयातील ३० टक्के महिलांना आरक्षण २. त्याची आवश्यकता काय आहे साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यातील दारीद्रय रेषेखालील महिलांना शिक्षण मिळावे. ३. कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक टीसीएम -१०९६/(८/९६)माशि-४ दिनांक-०५ सप्टे.१९९६ अन्वये संमती देण्यात आली होती.शासन निर्णय क्रमांक टीसीएम-१००१/१५६/२००१/माशि-४ दिनांक ६ ऑगस्ट २००१. ४. कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ५. माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा ज्या योजनेची माहिती आवश्यक असेल त्या योजनेबाबतचा सविस्तर तपशील व आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद अर्जात करणे आवश्यक आहे. ६. अर्ज कोठे सादर करावा शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ७. सेवा मिळण्यास कालावधी अनुदान उपलब्धतेनुसार. ८. उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १ स्त्रोत : शिक्षण संचालनालय, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र शासन