आय.सी.टी (Information & Communication Technology in School) माहिती तक्ता आय.सी.टी (Information & Communication Technology in School) १. सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . आय.सी.टी (Information & Communication Technology in School) २. त्याची आवश्यकता काय आहे? मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि शासकीय माध्य. शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापन करुन देणे. ३. कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते? केंद्र शासनामार्फत निर्गमित होणार्या आदेशानुसार कार्यवाही केली जात असून ७५:२५ टक्के अशा प्रमाणात केन्द्र-राज्य शासनाकडुन अनुदान उपलब्ध झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येते. ४. कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय ,महाराष्ट्र राज्य ,मध्यवर्ती इमारत,पुणे-१ ५. माहितीसाठी अर्ज किती प्रती ,कोणाकडे ,किती कागदपत्रे जोडावीत? सबंधित जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांचेमार्फत शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय म.रा. पुणे-१ ६. अर्ज कोठे सादर करावा? सबंधित जिल्हयाचा शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांचेमार्फत शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय म.रा. पुणे-१ ७. सेवा मिळण्यास कालावधी ८. उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा? शिक्षण संचालक(माध्यमिक व उच्च माध्यमिक)शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मध्यवर्ती इमारत,पुणे-१ ९. योजनेविषयी थोडक्यात माहिती आय.सी.टी केन्द्र पुरस्कृत योजना सन २००५-२००६ या वर्षापासून राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात येत आहे.माध्यमिक शाळांना आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करुन सगंणक साक्षरता वाढविणे व त्या सहाय्याने अस्तिवात असलेल्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता विकसित करणे तसेच माहितीच्या आणि डिजीटल युगाची विद्यार्थ्यांना ओळख होण्याच्या उद्देशाने ही योजना माध्यमिक स्तरावर राज्यात सन २००७-२००८ पासून राबविण्यात येत आहे. माहिती संकलक : अतुल पगार