इयत्ता १० वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण प्रश्नोत्तरे इयत्ता १० वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण १. सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . इयत्ता १० वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण २. त्याची आवश्यकता काय आहे सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध केल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे. ३. कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एफईडी-१०९६ प्र.क्र.१९७८/९६/साशि-5 दिनांक १३/०६/११९६. ४. कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ५. माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा ज्या योजनेची माहिती आवश्यक असेल त्या योजनेबाबतचा सविस्तर तपशील व आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद अर्जात करणे आवश्यक आहे. ६. अर्ज कोठे सादर करावा शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. ७. सेवा मिळण्यास कालावधी अनुदान उपलब्धतेनुसार ८. उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १ स्त्रोत : शिक्षण संचनालय महाराष्ट्र शासन