युवा धोरण देशाचे युवा धोरण-२००३ मध्ये जाहीर करण्यात आले. राज्यातील युवांचा समुचित विचार करून महाराष्ट्र शासनाने युवक कल्याण क्षेत्राचा आढावा घेऊन तसेच युवक कल्याण क्षेत्रात झालेले बदल विचारात घेऊन राज्याचे युवा धोरण २०१२ शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.युकधो-२०१ १/प्र.क्र.४३/क्रीयुसे-३, दिनांक १४ जून, २०१२ रोजी जाहिर करण्यात आले आहे. राज्याच्या नवीन युवा धोरणामध्ये खालील नमूद बाबींचा समावेश आहे. • युवा प्रशिक्षण केंद्राची स्थापना • जिल्हास्तरीय स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना • युवा पुरस्कार • युवा वसतिगृहाची स्थापना • युवा महोत्सवाचे आयोजन • युवा दिन युवा सप्ताह साजरा करण्यासाठी अनुदान मर्यादेत वाढ. • युवा विकासाचे कार्य करण्याऱ्या स्वयंसेवी संस्थानाअर्थसहाय्य मर्यादेत वाढ.ा अर्थसाहाय्य मर्यादेत वाढ. • युवा साहित्य संमेलनाचे आयोजन. • रोजगार उपलब्धता प्रसिद्धी • तालुका व जिल्हा स्तरावर युवा मित्रांची नियुक्ती • युवा संकेतस्थळ विकसित करणे. • दूरचित्रवाहिनीवर युवांसाठीच्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन • राज्यांतर्गत युवा आदान-प्रदान कार्यक्रम • जीवन कौशल्य शिक्षण • व्यवसाय शिक्षण कायदा • युवा सामाजिक प्रतिष्ठा निर्देशांक (सोशल क्रेडीट) • सुविधा केन्द्र उभारणी • कौशल्य विकास संस्था स्थापन करणे • राज्यांतर्गत व राष्ट्रीय युवा आदान-प्रदान कार्यक्रम • युवा नेतृत्व व व्यक्तिमत्व विकास प्रक्षिक्षण व इतर युवक कल्याणकारी कार्यक्रम माहिती संकलन - अमरीन पठाण