राष्ट्राच्या घटनात्मक योजना भारताच्या घटनेत राज्याच्या निती दाखविणा-या सिद्धांतांत कलम २१ ए, २४ आणि ३९ मध्ये मुलांच्या विकासासाठीची कारणे व त्याबद्दलची कर्तव्ये नमुद केली आहेत. कलम २१ ए शिक्षणाचा अधिकार राज्याच्या कायद्यात ठरविल्या प्रमाणे राज्याने ६ ते १४ वर्ष वयाच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण पुरवावे कलम २४ मुलांना कारखान्यात वगैरे काम करण्यापासून मज्जाव करणे कुठल्याही १४ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कारखान्यात,खाणीत वा जेथे त्यांच्या जीवाला धोका आहे अशा ठिकाणी काम करण्यास मज्जाव करणे कलम ३९ राज्याने, खासकरुन त्यांच्या योजना संरक्षणाकडे वळवाव्या (इ)कामगारांचे आरोग्य व शक्ति, स्त्री आणि पुरुष, व कोवळ्या वयात मुलांवर दुर्व्यवहार होऊ नयेत आणि त्यांच्यावर अशी कोणतीही दयनीय परिस्थिती येऊ नये जेणेकरुन त्यांना पैशाच्या आवश्यकते साठी आपल्या ताकद व शक्ति पेक्षा जास्त कांमात स्वतःला झोकावे लागेल.