राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार योजना /राज्य शिक्षक पुरस्कार योजना माहिती तक्ता राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार योजना /राज्य शिक्षक पुरस्कार योजना १. सेवेचे नाव/उपक्रम(विषय). १).राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार योजना २).राज्य शिक्षक पुरस्कार योजना २. त्याची आवश्यकता काय आहे समाजाची निस्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणार्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या गुणांचा यथोचित या उद्देशाने प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालयांतील शिक्षकांना पुरस्कार देण्याची योजना सुरु झाली.पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाल्याच्या दिनांकपासुन दोन आगाऊ वेतनवाढी देण्याची योजना कार्यन्वित आहे. ३. कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते अ).राष्टीय शिक्षक पुरस्कार योजना सन १९९५-५९ पासुन केंद्र शासनाने सुरु केलेली आहे. ब).राज्य शिक्षक पुरस्कार योजना सन १९६२ मध्ये राज्य केंद्र शासनाने सुरु केलेली आहे ४. कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा जिल्हयातील संबंधित शिक्षकांनी संबंधित जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद यांच्याकडे संपर्क साधुन विहित नमुन्यामध्ये प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे ५. माहितीसाठी अर्ज किती प्रती ,कोणाकडे ,किती कागदपत्रे जोडावे. संबंधित शिक्षकांनी त्यांचे विहित नमुन्यातील प्रस्ताव ३ प्रतीत जिल्हयाच्या संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद यांच्याकडे पाठवणे आवश्यक आहे.तसेच प्रस्तावासोबत विहित नमुन्यातील प्रपत्र भरुन शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. ६. अर्ज कोठे सादर करावा प्रस्ताव संबंधित शिक्षणाधिकारी(प्राथमिक/माध्यमिक)यांच्याकडे सादर करावेत ७. सेवा मिळण्यास कालावधी पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी प्रत्येक वर्षी जानेवारी मध्ये(राज्य शिक्षक पुरस्कार)जाहीर केली जाते.व केंद्र शासनाची यादी जुलै/ आँगष्ट मध्ये जाहीर केली जाते ८. उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय ,महाराष्ट्र राज्य ,मध्यवर्ती इमारत,पुणे-१ स्त्रोत : शिक्षण संचनालय महाराष्ट्र शासन